राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफांवर हल्ल्या 

कोल्हापूर: संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या दूषित पाण्यावरून काळम्मा बेलेवाडी ग्रामस्थांचा रास्ता रोखो केला होता. यावेळी आमदार हसन मुश्रीफ हे आंदोलकांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांची आंदोलकांशी बाचाबाची झाली. यामध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या दिशेने दूषित पाण्याच्या घागरी फेकण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

साखर कारखान्यांमुळे विहिरीला आणि बोरला दूषित पाणी येते या कारणावरून काळम्मा बेलेवाडी ग्रामस्थांसह हजारो महिला आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे घरामध्ये दूषित पाणी येत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)