गजभिये यांच्यावर सोशल मीडियावर टीकास्त्र
मुंबई: शिवाजी महाराजांच्या पोशाखात येऊन सत्ताधाऱ्यांना चालते व्हा!, असा आदेश देत प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचे अभिनव आंदोलन आमदार प्रकाश गजभियेंनी विधानभवनाच्या आवारात केले. आरक्षण, शिवस्मारक, कर्जमाफीच्या पोकळ आश्वासनांशिवाय जनतेला काही मिळाले, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.
मात्र, आमदार प्रकाश गजभिये यांच्या एका कृतीमुळे त्यांच्यावर टीका देखील झाली आहे. गजभिये यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर याना विधिमंडळ परिसरात मुजरा केला. आपण शिवरायांच्या वेशात आहोत, हे गजभिये विसरले होते. त्यामुळे ते टीकेचे धनी झाले आहेत.
सोशल मीडियावर शिवभक्तांनी प्रकाश गजभिये यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
शिवाजी महाराजांच्या पोशाखात येऊन बेमूर्वतखोर सत्ताधाऱ्यांना चालते व्हा असा आदेश देत प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचे अभिनव आंदोलन आ. प्रकाश गजभियेंनी विधानभवनाच्या आवारात केले. आरक्षण, शिवस्मारक, कर्जमाफीच्या पोकळ आश्वासनांशिवाय जनतेला काही मिळाले नाही ही त्यांची कैफियत आहे. pic.twitter.com/nJxDPhtaJd
— NCP (@NCPspeaks) November 22, 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा