राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे करणार भाजपात प्रवेश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार निरंजन डावखरे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे सुपुत्र असणाऱ्या निरंजन डावखरे यांची पक्षातील जितेंद्र आव्हाड, प्रकाश परांजपे या स्थानिक नेत्यांकडून कोंडी केली जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मन परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत निरंजन डावखरे घड्याळ सोडून कमळ हाती घेण्याची शक्यता आहे.

निरंजन डावखरे हे सध्या कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांच्या आमदारकीची टर्म संपत आलेली असतानाच पक्षात कोंडी होऊ लागल्याने ते अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आले. त्यांच्या पक्षांतरांचा मुहूर्त पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा ठरवण्यात आल्याने त्याचा फटका काँग्रेसला तर फायदा भाजपाला होणार आहे. दिवंगत वसंत डावखरे यांना मानणारा एक मोठा वर्ग पालघर, ठाणे जिल्ह्यात आहे. तो भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाला ठाणे पट्ट्यात एक तरुण चेहरा लाभणार असल्याने भाजपा नेतेही डावखरेंच्या पक्षप्रवेशासाठी सकारात्मक आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)