गणेशोत्सवानिमित्ताने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. क्षीरसागर आणि त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान “वर्षा’वर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

जयदत्त क्षीरसागर यांनी यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस जेव्हा बीडमध्ये आले होते, तेव्हा ते थेट क्षीरसागर यांच्या घरी चहा-पाण्यासाठी गेले होते. तेव्हापासून क्षीरसागर यांची भाजपसोबतची जवळीक दिवसेंदिवस वाढत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर, क्षीरसागर हे पंकजा मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे “रॉयल स्टोन’वर गेले. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजपाकडून विधानपरिषदेचे आमदार झालेले सुरेश धस त्यांच्यासोबत होते.

काही दिवसांपूर्वीच बीडची राष्ट्रवादी म्हणजे धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे यासोबतच संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते. एवढेच नाही तर पवारांना बीड भेटीचे आमंत्रण सुद्धा त्यांनी दिले होते. त्यामुळे त्या भेटीनंतर आता क्षीरसागर आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याने क्षीरसागरांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)