राष्ट्रवादीची भिस्त आ.जगताप पितापुत्रांवर

कळमकरांसह अनेक निष्ठवंतांचा सहभाग दूर डोंगर

नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसची रणनितीही सध्या तरी कोणाला कळत नाही. छुप्प्या पद्धतीने नियोजन चालू असून विरोधी शिवसेना व भाजपच्या रणनितीवर लक्ष ठेवून आमदार अरूण जगताप व पुत्र आमदार संग्राम जगताप आपली दिशा ठरवित असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे कार्यकर्त्यांची फौज मोठी असली तरी उमेदवारांचा वाणवाच आहे. त्यामुळे आ. पितापुत्रांची डोकेदुखी वाढली असली तरी सध्या राष्ट्रवादीत सर्वसर्वा म्हणून तेच भूमिका बजावत आहेत. या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह अनेक पक्षाचे निष्ठावंत प्रक्रियेपासून दूर राहूनच बरोबर असल्याचे भासवत आहे.

आ.संग्राम जगताप यांच्या खांद्यावर महापालिका निवडणुकीची सर्व धुरा असल्याने ते पायात भिंगरी लावून फिरत आहे. कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्यास आ. जगताप तसे निरुत्साही आहेत. स्वबळावरच निवडणूक लढण्याचा त्याचा प्रयत्न आहे. परंतू पक्षाच्या नेत्यांसह कॉंग्रेसकडून होत असलेल्या आग्रहामुळे नाईलाजास्तव आघाडी करावी लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आ. जगताप महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. त्या दृष्टीने त्यांनी उमेदवारांची चाचपणी देखील केली आहे. आता केवळ मुलाखती घेण्याचा सोपस्कार पूर्ण करणार आहे. शिवसेना व भाजप यांच्या युती होणार नसल्याने त्यांच्या मतविभागणीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने नियोजन आ. जगताप यांनी केले आहे. परंतू शहर राष्ट्रवादीत सध्या आ. जगताप यांचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याने पक्षातील जुने व नव्याने आलेले नेते व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ते जाहीरपणे विरोध करीत नसले तरी आ. जगताप यांच्या सुरात सुर देखील ते मिसळवित नाही. आलिप्त राहून आपण आ. जगताप यांच्याबरोबर असल्याची भूमिका ते सध्या बजावत आहे. त्यामुळे ही मोठी डोकेदुखी आ. जगताप यांच्यापुढे वाढली आहे.

महापालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी तशी पक्षाने आ. संग्राम जगताप यांच्यावर टाकली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता यावे, या दृष्टीने त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे. त्यात दयनीय अवस्था असलेल्या कॉंग्रेसला देखील बरोबर द्यावे लागणार आहे. पक्षाने महापालिका निवडणुकीची जबाबदारी टाकली असली तरी पक्षाचा एक नेता अद्यापपर्यंत फिरकला नाही. पक्षाचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील, पक्षाचे निरिक्षक अंकुशराव काकडे हे अद्यापही आले नाही. उद्या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहे. परंतू अद्यापही हे नेते आले नाही की त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत विचारणा केली. त्यामुळे आ. जगताप पितापुत्रांना सर्व ताकदीनिशी या निवडणुकीला समोर जावे लागणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आ. संग्राम यांच्यावर जबाबदारी टाकून हात झडकले आहे की काय असे वाटत आहे.

आघाडीबरोबर चर्चा देखील आ. संग्राम करीत आहे. अन्य नेते अद्यापही चर्चेत सहभागी झाल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादीने आ. संग्राम यांना महापालिका निवडणुकीत प्रकाशझोतात आणण्याची भूमिका घेतल्याने तसेच आ. संग्राम यांनी देखील कार्यकर्त्यांच्या बळावर या निवडणुकीला समोरे जाण्याचे ठरविल्याने आ. संग्राम ही निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे हताळत आहेत. कार्यकर्त्यांचे बळ मोठे आहे परंतू उमेदवार नसल्याने आ. संग्राम यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पक्षातील जुने व नवीन नेते व कार्यकर्ते नाराज असले तरी आ. संग्राम यांनी शिवसेना व भाजपमधील अनेक मातब्बर नेत्यांचा प्रवेश त्यांनी घडवून आणला आहे. आता ते मातब्बर उमेदवार असले तरी काही प्रभागात अद्यापही उमेदवारांचा शोध सुरू आहे.

काही प्रभागात उमेदवारीवरून संघर्ष
राष्ट्रवादीला काही प्रभागात उमेदवार नाही तर काही प्रभागात उंदड उमेदवार झाले आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी स्पर्धा होवू लागली आहे. त्यातून पक्षपातळीवर संघर्ष उभा राहण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टीने सध्या आ. जगताप पितापुत्र प्रयत्नशिल आहेत. बंडखोरी व वाद टाळण्यासाठी आ. संग्राम कार्यकर्त्यांची समजूत काढीत आहेत. पक्षाच्या वरिष्ठपातळीवरील नेत्यांकडून या निवडणुकीकडे पाहिले जात नसल्याने स्थानिक नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्‍त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
2 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)