राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर

नगर: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची 103 पदाधिकारी असलेली जम्बो कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आणि कार्याध्यक्ष संदिप वर्पे यांनी पक्षाचे प्रभारी दिलीप वळसे पाटिल यांच्याशी चर्चाकरून आज अखेर जाहिर केली.
या जम्बो कार्यकारिणीत बाबासाहेब भिटे, किसनराव लोटके, सबाजी गायकवाड अश्‍या मोजक्‍याच मातब्बरांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कार्यकारिणीत अध्यक्ष व कार्याध्यक्ष वगळता 23 उपाध्यक्ष, 29सरचिटणीस, 12सचिव,19 जिल्हा संघटक, 18 कार्यकारिणी सदस्यांचा समावेशकरण्यात आला आहे. कार्यकारिणी पुढील प्रमाणे राजेंद्र फाळके जिल्हध्यक्ष (कर्जत), संदिप वर्पे कार्याध्यक्ष (कोपरगाव), मिनानाथ पांडे (अकोले), अविनाश थोरात (संगमनेर), रमेश गोंदकर (राहाता), अशोक चौधरी(नेवासे), अजित कदम (श्रीरामपुर), काकासाहेब नरवडे, अरुण पाटिल लांडे (शेवगाव), सुदाम नवले, भगवान गोरखे(श्रीगोंदा) सीताराम बोरुडे, चंद्रकांत म्हस्के,संभाजी पालवे(पाथर्डी), विजय मोढवे, राजेंद्र गुंड, रघुनाथ काळदाते (कर्जत), किसनराव लोटके, पोपटराव म्हस्के(नगर) बाबासाहेब भिटे (राहुरी) सबाजी गायकवाड, अर्जून भालेकर, अरुण ठाणगे, गंगाराम बेलकर (पारनेर) सुरेश भोसले, (जामखेड) आदींचा उपाध्यक्ष म्हणून तर कैलास वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे (अकोले) सुभाष गाडे, देवराम गावंदे, सचिन मुंजगुले(कोपरगाव) सुरेश निमसे, भागचंद औताडे, बाबासाहेब खोसरे (श्रीरामपुर) डॉ. नारायण म्हस्के,वसंतराव देशमुख, गणेश गव्हाणे (नेवासे) शशिकांत लोळगे, सुधाकर शिंदे, (राहाता) श्रीमती उषाताई कपिले (संगमनेर), मिनाताई आढाव (श्रीगोंदा), हरिभाऊ भांडवलकर, वसंत कांबळे (कर्जत), अमजद पठाण, संजय वराट, गोलेकर नितीन (जामखेड), शिवाजी पानमंद, बाळासाहेब लामखडे,निझाम पटेल, दिलीप ठुबे (पारनेर)बाळासाहेब खुळे, सुनिल अडसुरे (राहुरी), राजाजी बुधवंत ,निवृत्ती दातीर,जमीर पटेल (शेवगाव आदींची निवड सरचिटणीस म्हणून करण्यात आली आहे,तर कैलास जाधव, संतोष शेळके (अकोले)रामदास केकाण (कोपरगाव), दिपक बाराहाते (श्रीरामपुर), तुकाराम मिसाळ (नेवासा), सेवराम वडितके, ऋषीकेश डावखर(श्रीरामपुर)डॉ.कैलासहजारे, (जामखेड), इलियास शैख (राहुरी), भाऊराव भोंगळे, पंडितराव भोसले, बबन पवार (शेवगाव )यांची निवड चिटणीस म्हणुन, तर काळू भांगरे, सुभाष गोडसे, राजेंद्र गवांदे, विकास देशमुख अरुण शेळके, (अकोले)चांगदेव आगवान, देवेन दोहमारे (कोपरगाव), नजीर मुलानी, दत्तात्रय जाधव (श्रीरामपुर) राजेंद्र घावटे, (नेवासे), अण्णासाहेब मोरे, गुलाबराव तनपुरे, उमेश परहर (कर्जत) विजयसिंह गोलेकर, सखारामभोरे, (जामखेड) गंगाराम रोहोकले, सुभाष बेलोरे, बाळासाहेब माळी(पारनेर) सुखदेव बलमे (राहुरी यांची जिल्हा संघटक पदी वर्णी लागली असून भरत घाणे, संतोष बनसोदे, लक्ष्मण मिंडे, माधव घुले(अकोले), किशोर महाले, नंदकुमार पटारे, अरुण कवडे, नितीन गवारे (श्रीरामपुर) प्रदीप पाटिल, सुनील कोठारी(जामखेड), सुभाष खोसे, महेश ढुस, संतोष थोरात, पांडुरंग येवले, सुरेश पटारे, भिवसेन मुंगसे, (पारनेर) नामदेव काळे(नगर) शिवाजी मंडलिक (राहुरी) निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)