राष्ट्रवादीची कमान पुन्हा सुनील माने यांच्याकडे

सातारा:प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीने राज्यातील 44 पैकी 24 जिल्हाध्यक्षांच्या निवडी गुरूवारी जाहीर केल्या. या निवडीमध्ये सातारा जिल्हा राष्ट्रवादीची कमान पुन्हा सुनील माने यांच्याकडेच देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ही निवड 2020 पर्यंत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा जिह्यात प्राबल्य आहे. त्यामुळे या पक्षातले कोणतेही पद मिळाले तरी ते घेण्यासाठी अनेकजण शक्तीप्रदर्शन दाखवत नेत्यांवर प्रभाव पाढत असतात. नुकत्याच राज्यात राजकीय मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अनेक बदल केले जात आहेत. साताऱ्यातही क्रियाशील सभासदांची मोट बांधण्यात येणार असून त्याच अनुषंगाने नव्या दमाचा अध्यक्ष कसा असावा यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. अनेकांनी आपली इच्छा व्यक्त केली होती. परंतु जिह्यातील वरीष्ठ नेते मंडळींनी खमक्‍या जिल्हाध्यक्ष म्हणून केवळ सुनील माने हेच चांगले काम पाहू शकतात. असे मत पक्षनिरीक्षकांच्या अहवालात नोंदवण्यात आले होते. त्यामुळे माने यांचेच नाव आघाडीवर होते. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये ते प्रभावीपणे बांधणी करु शकता. त्यामुळे त्यांच्याच नावाची शिफारश ज्येष्ठ मंडळीकडून वरीष्ठ पातळीवर करण्यात आली होती. या निवडीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव मतदार संघाला झुकते माप मिळाल्याची चर्चा आहे. सुनील माने हे आमदार शशिकांत शिंदे व आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष मर्जीतील समजले जातात. दोन वेळा रहिमतपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. राष्ट्रवादीत त्यांचा संपर्क प्रभाव दांडगा होता. त्यामुळेच त्यांना पुन्हा कामांची संधी मिळाल्याचे बोलले जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)