राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांमध्ये बदल

पुणे  : अगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे.  त्यात पक्षाच्या वेगवेगळया सेलच्या अध्यक्षांच्या फेर नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत.अचानक करण्यात आलेल्या या बदलांमुळे कार्यकर्ते संभ्रमात असून पक्षात अंतर्गत गटबाजी असल्याच्या उलट सुलट चर्चांना शुक्रवारी दिवसभर उधान आले होते. दरम्यान, पक्षाच्या वेगवगेळया सेलच्या पदाधिकाऱ्यांना राज्य कार्यकारीणीत बढती देत, संघटनेतील दुसऱ्या फळीला वेगवेगळया सेलची जबाबदारी देण्यात आली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. आहे. तसेच जुन्या पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली असून त्यांना राज्याच्या तसेच शहराच्या संघटनेत स्थान देण्यात आल्याचा दावा शहराध्यक्ष तुपे यांनी केला आहे. पक्षाचे शहरात राष्ट्रवादीचे महिला, युवक ,विद्यार्थी, युवती अल्पसंख्यांक कामगार अशा समाजातील विविध घटकांमध्ये काम करण्यासाठी सेल आहेत.

 

    पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रीया गेल्या चार महिन्यांपासून सुरू होती. त्यासाठी सर्व इच्छूकांचे रितसर अर्ज मागविण्यात आलेले होते. लोकसभा निवडणूकीपूर्वीच या नेमणूका करण्यात येणार होत्या.मात्र, त्या निवडणूकीच्या गडबडीत राहून गेल्या होत्या. तसेच या बदलांची कल्पना मावळत्या अध्यक्षांच्या शेवटच्या बैठकीतही देण्यात आली होती. त्यामुळे हे बदल अचानक करण्यात आलेले नाहीत- चेतन तुपे ( शहराध्यक्ष)

या सर्वच सेलच्या अध्यक्ष बदलण्यात आले असून नवीन अध्यक्षांची घोषणा शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी शुक्रवारी केली. याबाबत पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या नेमणुका करत असताना पूर्वीच्या संघटनेच्या व सेलच्या शहराध्यक्ष यांना त्याच्या विभागाच्या प्रदेश कार्यकारणी मध्ये स्थान देण्यात आलं तसेच काही लोकांना पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारणी मध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहे. तर या नेमणूका करताना, सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचे धोरण पक्षाने अवलंबिले असल्याचे तुपे म्हणाले.

 

असे आहेत नवीन अध्यक्ष
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस – स्वाती पोकळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस -महेश हांडेराष्ट्रवादी विद्यार्थी सेल – विशाल मोरे , राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस – अश्विनी परेरा , राष्ट्रवादी अल्पसंख्यांक कॉंग्रेस – अजीम गुडाकुवाला, राष्ट्रवादी कांग्रेस कामगार सेल – राजेंद्र कोंडे , राष्ट्रवादी कॉंग्रेस पर्यावरण सेल – समीर निकम, राष्ट्रवादी कॉंग्रेस सांस्कृतिक सेल – प्रमोद रणवरे , राष्ट्रवादी कॉंग्रेस आयटी सेल – ययाती चरवड , राष्ट्रवादी कॉंग्रेस ज्येष्ठ नागरिक सेल – शंकर शिंदे , राष्ट्रवादी कॉंग्रेस सोशल मीडिया सेल – सुकेश पासलकर , राष्ट्रवादी कॉंग्रेस पथारी सेल – अल्ताफ शेख

Ads

1 COMMENT

  1. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहर संघटनेने जोरदार काम करावे ही सदिच्छा 🙏🏻बाळासाहेब जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here