राष्ट्रवादीकडून मावळसाठी वाघेरे, भोईर इच्छूक

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आले आहे. गतवर्षी राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी याठिकाणाहून लढण्याची इच्छा पक्षाच्या मुंबईतील आढावा बैठकीत व्यक्त केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेत, मावळातून राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत.

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ हे मावळ लोकसभा लढणार असल्याची चर्चा रंगल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष मावळ लोकसभा मतदार संघावर केंद्रीत झाले आहे. मात्र, मुंबईत आजपासून राष्ट्रवादीच्या लोकसभानिहाय आढावा बैठकीला सुरुवात झाल्यानंतर, मावळातून पार्थच्या उमेदवारीबाबत शरद पवार अनुकूल नसल्याचे दिसून आले. तर अजित पवार यांनी देखील मौन बाळगले आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आता या जागेसाठी माजी महापौर संजोग वाघेरे आणि भाऊसाहेब भोईर हे दोघे जण इच्छूक आहेत. त्यामुळे यंदातरी राष्ट्रवादीवर उमेदवार आयात करावा लागणार नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मावळचे नेतृत्व शिवसेना खासदार श्रीरंग बारणे करत आहेत. गेल्या निवडणुकीत शेकापचे लक्षमण जगताप यांचा पराभव केल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, त्यांना कायम चर्चेत राहता आले नाही. तीव्र राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले लक्षमण जगताप गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी वाटच पाहत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपात मावळ लोकसभा राष्ट्रवादीच्या वाट्याला आला आहे. राष्ट्रवादीला आतापर्यंत दोन्ही वेळा आझम पानसरे -2009 आणि संजय नार्वेकर-2014 यांना या मतदार संघातून पराभव स्वीकारावा लागला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत देखील पार्थ पवारच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. मात्र, ही केवळ चर्चा आहे. पार्थ हे मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार नाहीत. आतापर्यंत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तावर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे. याशिवाय स्वत: शरद पवार पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याच्या वृत्ताचे देखील त्यांनी खंडन केल्याची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.

दोन्ही इच्छुकांच्या मुलाखती
मावळ लोसभा मतदार संघातून निवडणुक लढण्यास इच्छूक असलेले संजोग वाघेरे आणि भाऊसाहेब भोईर यांची मुलाखत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने घेतली. मतदार संगात तुम्ही कशाप्रकारे काम कराल, यांसारखे प्रश्‍न विचारून मावळमधून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. उमेदवारी निश्‍चित झाली नसली, तरी देखील दोन्हींपैकी एका इच्छुकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)