राष्ट्रवादीकडून बिनबुडाचे आरोप

पिंपरी – भाजपचे यश खटकत असल्याने राष्ट्रवादीकडून बिनबुडाचे आरोप केला जात असल्याचे प्रत्युत्तर सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले आहे. पाणी टंचाई ही राष्ट्रवादीच्या कार्यकाळातील चुकीच्या कारभाराचे देणं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीच्या कामावर भाजपचे पदाधिकारी ढोलकी वाजवत आहेत, असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना एकनाथ पवार यांनी म्हटले आहे की, शहरातील पाणीटंचाई ही राष्ट्रवादीमुळे होत आहे. राष्ट्रवादीने पाण्याचे नियोजन न केल्याने चोविसतास पाणी पुरवठ्याचा फज्जा उडाला आहे. त्याचा परिणाम म्हणून नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पवना धरणातून 48.576 दशलक्ष घनमीटर, भामा-आसखेड धरणातून 60.79 दशलक्ष घनमीटर तर आंद्रामधून 38.87 दशलक्ष घनमीटर पाणी असे एकूण 148.236 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणासाठी जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. हे आरक्षण करुन घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून दोन्ही आमदारांनी पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच हे यश आले आहे. या उलट तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्वार्थासाठी पाण्याचे राजकारण केले.

भामा-आसखेड व आंद्रा धरणातील पाण्याच्या आरक्षणाला मंजुरी मिळूनही त्यासाठी पुर्नस्थापना रक्‍क्‍म राष्ट्रवादीने भरु दिली नाही. या विलंबामुळे पाण्याचे आरक्षण रद्द्‌ झाले. असे असतानाही विरोधी पक्षनेतचे बिनबुडाचे आरोप आमच्यावर करत आहेत. खेर तर त्यांच्या काळातच आरक्षण रक्कमसंबंधीत विभागाकडे वर्ग होणे अपेक्षीत होते. राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणामुळेच हा उशीर झाला आहे. हे यश आता भाजपला मिळाले ही बाब राष्ट्रवादीला खटकत आहे. उलट विकासकामात राष्ट्रवादीने मोठा भ्रष्टाचार केला आहे. ज्यामुळे अनेक कामे रखडली आहते. त्यामुळेच जनतेने सत्तेतून पायउतार केले आहे. आपण सत्ताधारी असल्याच भास आजही त्यांना होत आहे, त्यामुळे ते असे आरोप करत असल्याचे एकनाथ पवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)