राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा भारत घडवू – पंकजा मुंडे

मुंबई: महात्मा गांधी यांनी खरा भारत खेड्यात राहतो, खेड्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल असा नारा दिला, त्याच  विचारांची आज दीडशे वर्षांनीसुद्धा गरज लागत आहे. ग्रामीण भागात चांगले जीवन जगण्यासाठी सगळे मिळून गाव स्वच्छ ,सुंदर बनवू, आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान या विचारांचा भारत घडवू, असे प्रतिपादन ग्राम विकास, महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘पोषण महा एक जन आंदोलन’पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘सबकी योजना सबका विकास’ अभियानाचे उद्घाटन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या.

-Ads-

ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, महात्मा गांधी यांनी सांगितले होते की,स्वच्छता, रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले तरच खेड्यांचा विकास होऊ शकतो. शहरांकडे जाणारी लोंढे  थांबवता येऊ शकतात, हे करण्यासाठी ग्रामीण उद्योगाला चालना, युवकांना उद्योग व्यवसाय प्रशिक्षण देऊन रोजगाराचा प्रश्न मिटवला पाहिजे हेच विचार, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभावीपणे राबविले आहेत. राज्यात शौचालय 100 टक्के बांधण्यात आली आहेत. शौचालयाचा वापर नागरिकांनी केला पाहिजे, राज्याचा स्वच्छतेमध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)