राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुरीच्या जगन्नाथ मंदिरात जाण्यापासून रोखले

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंदा यांच्यासोबत पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात भेदभाव झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून राष्ट्रपती भवन प्रशासनाकडून पुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहिण्यात आले आहे. दरम्यान, मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक आयएएस अधिकारी प्रदिप्तकुमार मोहापात्रा यांनी देखील राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीसोबत गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले असून याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद सपत्नी १८ मार्च २०१८ रोजी पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, सेवेकऱ्यांच्या एका गटाने मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना रोखले. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. हा वादग्रस्त गंभीर मुद्दा २० मार्च रोजी श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाच्या बैठकीतही उपस्थित करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

१८ मार्च रोजी राष्ट्रपतींसोबत घडलेल्या या भेदभावाच्या प्रकारानंतर १९ मार्च रोजी राष्ट्रपती भवनातून पुरीचे जिल्हाधिकारी अरविंद अग्रवाल यांना कडक शब्दांत पत्र लिहिण्यात आले. यामध्ये सेवेकऱ्यांकडून करण्यात आलेल्या भेदभावाच्या गंभीर प्रकारावर आक्षेप घेण्यात आला. दरम्यान, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक आयएएस अधिकारी प्रदीप्तकुमार मोहापात्रा यांनीही राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीसोबत असा प्रकार घडल्याचे मान्य केले आहे. मात्र, हे प्रकरण गंभीर असल्याने त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)