राष्ट्रपती पदक विजेते वगसम्राट दादू इंदुरीकर यांना अभिवादन

इंदोरी – राष्ट्रपती पदक विजेते वगसम्राट कै. दादू इंदुरीकर यांचा स्मृतिदिन इंदोरी ग्रामपंचायत येथे साजरा करण्यात आला. इंदोरी गावचे नाव संपूर्ण देशात गाजवलेले स्व. दादू इंदुरीकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त उपसरपंच अंकुश ढोरे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले.

या वेळी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य विक्रम पवार, उद्योजक निलेश पानसरे, सुशांत पानसरे, ग्रामपंचायत कर्मचारी विजय हिंगे आणि योगेश सावंत आदी उपस्थित होते.जसराज थिएटरच्या “गाढवाचं लग्न’ या वगनाट्यातील सावळ्या कुंभाराची भूमिकेमुळे लोककलेतील हिरा ठरलेले वगसम्राट दादू इंदूरीकर मावळच्या भूमीत जन्मले याचा महाराष्ट्रासह स्थानिकांनाही विसर पडल्याचे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या बहुआयामी कलाकाराचा महाराष्ट्र शासनासह स्थानिकांनाही विसर पडलेला दिसतोय ही बाब खेदजनक आहे. आजपर्यंत अनेक नेते, पुढाऱ्यांनी इंदोरी येथे येऊन नुसत्या घोषणा आणि आश्‍वासने दिली; मात्र पुढे काहीच केले नाही. इंदुरीमध्ये दादूंच्या स्मरणार्थ लोककला, लोकसाहित्य आणि तमाशा कला प्रशिक्षण केंद्र विकसित केल्यास निखळ लोकरंजनाची कला त्यांच्या नावाने अखंडित राहील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्‍त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)