राष्ट्रपती निवडणूक : भुजबळ, कदम करणार मतदान

 

मुंबई – देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचं मतदान होत आहे. विशेष म्हणजे जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे दोघेही मतदान करतील.

पैशांच्या अफरातफरीप्रकरणी छगन भुजबळ सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहेत. तर रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणात भायखळा जेलमध्ये आहेत.

या दोघांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करु द्यावं, अशी मागणी पीएमएलए कोर्टाकडे केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली आहे. दरम्यान, भुजबळ आणि रमेश कदम यांना पोलिस संरक्षणात जेलमधून विधानसभेत मतदानासाठी नेण्यात येईल. तिथे मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा जेलकडे नेण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)