राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध करा – रामदास आठवले

पुणे,दि.19(प्रतिनिधी)-एनडीएने राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणुन भाजपचे दलित नेते आणि बिहारचे विद्यमान राज्यपाल रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर केली आहे. हा क्रांतीकारी निर्णय आहे. दलित व्यक्ती राष्ट्रपती होत असल्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी उमेदवार देऊ नये. ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. के. आर. नारायणन यांच्यानंतर दुस-यांदा दलित समाजाला राष्ट्रपती पदासाठी न्याय मिळाला आहे. यामुळे केंद्र सरकार आरक्षण, संविधान आणि दलित विरोधी असल्याचा प्रचार करणाऱ्या विरोधकांचे तोंड बंद करण्याचे काम पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी केले आहे. हा आजपर्यंतचा क्रांतिकारी निर्णय असून या निर्णयाचे स्वागत असल्याची भूमिका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांनी मांडली.

यावेळी आठवले पुढे म्हणाले की एनडीए चा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेसह सर्व पक्षांशी चर्चा करण्यात येणार आहे. उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून ते देखील उमेदवारास पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)