राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना शिवसेनेचा पाठिंबा

मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची मातोश्रीवर बैठक घेऊन यासंदर्भात चर्चा केली आणि त्यानंतर रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला. रामनाथ कोविंद हे बिहारचे विद्यामान राज्यपाल आहेत.
रामनाथ कोविंद यांच्या नावाला शिवसेना पाठिंबा देणार की नाही, याबाबत कालपासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. अखेर कोविंद यांच्या नावाला पाठिंबा देऊन शिवसेनेने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. हिंदूराष्ट्रासाठी मोहन भागवत हे आम्हाला राष्ट्रपती म्हणून हवे होते आणि भागवत राष्ट्रपती व्हावेत, असे अजूनही आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही या भूमिकेवरुन यूटर्न घेतला नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपला प्रत्येकवेळी विरोध करावा, अशी आमची भूमिका नाही. मात्र, जिथे पटणार नाही, तिथे आम्ही विरोध करणारच, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)