राष्ट्रपतीपदासाठी कॉंग्रेसकडून स्वामीनाथन यांचे नाव ?

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आता चांगलाच रंगत भरताना दिसत आहे. कारण शिवसेनेपाठोपाठ आता कॉंग्रेसनेही ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ एम.एस.स्वामीनाथन यांच्या नावाला पसंती दिल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. भाजपच्या दलित कार्डला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेस किसान कार्ड पुढे आणण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार कॉंग्रेसने राष्ट्रपतीपदासाठी हरित क्रांतीचे प्रणेते आणि ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ एम.एस.स्वामीनाथन यांच्या नावाला पहिली पसंती दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी शिवसेनेनेही राष्ट्रपतीपदासाठी स्वामीनाथन यांचेच नाव सूचवले होते. पण, भाजपने रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर केले, ज्यामुळे शिवसेना काहीशी नाराज आहे. त्यामुळे याच नाराजीचा फायदा घेत एनडीएत फूट पाडण्यासाठी कॉंग्रेस स्वामीनाथन याचे नाव पुढे करण्याच्या तयारीत आहे. स्वामीनाथन यांच्यानंतर कृष्ण गांधी यांना कॉंग्रेसने दुसरी पसंती दिली आहे. पण, यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा सहकारी पक्षांसोबतच्या चर्चेनंतरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असे असले तरी शिवसेना आता कोणाच्या बाजूने उभे राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपने राष्ट्रपतीपदासाठी दलित चेहरा देऊन मास्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला असला, तरी शिवसेना मात्र रामनाथ कोविंद यांच्या नावावर प्रचंड नाराज आहे. फक्त दलितांच्या मतावर डोळा ठेवून भाजपने कोविंद यांच्या नावाची घोषणा केली असून, मतांसाठी हे राजकारण चुकीचे आहे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)