राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून लालू-नितीश यांच्यात मतभेद

पाटणा, दि. 20 – राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत एनडीएने जो दलित उमेदवार दिला आहे त्यांना पाठिंबा देण्याच्या मुद्‌द्‌यावरून लालूप्रसाद यादव आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात मतभेद निर्माण झाले असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली. काल कोविंद यांची निवड जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजभवनात जाऊन कोविंद यांना शुभेच्छा दिल्या. तथापी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा विषय त्यांनी गुलदस्त्यातच ठेवला होता.
तथापी कोविंद यांच्या निवडीचे नितीशकुमार यांनी स्वागत केल्यामुळे संयुक्त जनता दलातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची त्यांची भूमिका असल्याचे अधोरेखीत झाले आहे. बिहार मध्ये संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल यांचे संयुक्त सरकार सत्तेवर आहे. नितीशकुमार यांचा ओढा जरी कोविंद यांना पाठिंबा देण्याचा दिसत असला तरी राष्ट्रीय जनता दल मात्र त्यासाठी राजी नाही असे सांगण्यात येते. भारतीय जनता पक्षाने लालूप्रसाद यांचे बिहार मध्ये मंत्री असलेले दोन पुत्र आणि खासदार कन्या या तिघांवर बेहिशोबी मालमत्ता जमवल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांच्या मागे सीबीआय चौकशीचा ससेमीरा लावला आहे त्यावरून लालू भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास राजी नाहीत असे सांगण्यात येते. येत्या गुरूवारी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल त्यात राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीविषयी निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे. विरोधकांची मदार संयुक्त जनता दलाच्या भूमिकेवर ठरणार आहे. जर नितीशकुमार यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर युपीएत दुफळी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेही या संबंधातील आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. युपीएने दलित उमेदवार दिला तरच युपीएला पिांठंबा देऊ अन्यथा कोविंद यांना पाठिंबा देण्यास आमची काही अडचण नाही असे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी कालच जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)