राष्ट्रपतींना लाच दिल्याप्रकरणी सॅमसंगच्या प्रमुखाला अटक

सेऊल – सॅमसंग स्मार्टफोन कंपनीच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती पार्क ग्वेन यांना लाच दिल्याच्या आरोपाखाली जे वाय ली यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयात तब्बल 10 तास सुनावणी सुरू होती. ली यांनी 36 मिलिअन डॉलर्सची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. दोन कंपन्यांचं विलिनीकरण करण्यासाठी समर्थन मिळावे. यासाठी त्यांनी ही लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)