राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती

नवी दिल्ली : राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती केली आहे. यामध्ये  राम शकल, राकेश सिन्हा, रघुनाथ मोहापात्रा आणि सोनल मानसिंग यांचा सहभाग आहे. हे या चारही दिग्गज आपापल्या क्षेत्रात माहीर आहेत. शिवाय त्यांचे त्या क्षेत्रातील योगदानही मोठे आहे. 2019 च्या निवडणूकीला डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने चार वेगवेगळ्या राज्यातून चार जणांची निवड केली आहे.

क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, अनू आगा आणि अभिनेत्री रेखा यांचा कार्यकाळ संपला होता. राष्ट्रपतीनियुक्त करत असलेल्या 12 पैकी चार जागा जागा रिकाम्या झाल्या होत्या त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चार जणांची निवड केली आहे. चित्रपट आणि खेळाशी निगडीत असलेल्या एकाही दिग्गज व्यक्तीला राज्यसभेवर पाठवले नाही. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या चार खासदारांमध्ये ज्येष्ठ नेते राम शकल, लेखक-स्तंभकार राकेश सिन्हा,  शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा आणि शास्त्रीय नृत्यांगणा सोनल मानसिंग या दिग्गजांचा समावेश आहे.  हे चार वेगवेगळ्य राज्यातील आहे. यामध्ये राम शकल उत्तरप्रदेशमधील आहेत. त्यांनी दलित वर्गासाठी मोठे काम केले आहे.  राकेश सिन्हा संघ विचाराचे  असून ते टिव्ही चॅनेलवर भाजपाची बाजू मांडत असतात. राकेश सिन्हा दिल्ली विद्यापिठामध्ये प्राध्यपक म्हणून कार्यरत आहेत. सोनल मानसिंह या देशातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगणा आहेत. ओडिशाचे शिल्पकार रघुनाथ महापात्रा यांनी जगन्नाथ मंदिराचे महत्वपूर्ण काम केले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)