राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी निविदा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक 107 मीटर उंचीवर उभारलेल्या राष्ट्रध्वजाची शिलाई उसवल्याने स्वातंत्र्य दिनानंतर हा ध्वज उतरवून ठेवण्यात आला होता. मात्र, आता हा राष्ट्रध्वज आठ महिने फडकवत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भारत-पाकिस्तानच्या वाघा बॉर्डरवर मोठ्या उंचीवर ध्वज फडकविण्याचे काम करणाऱ्या संस्थेला आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात सुमारे 107 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक उंची असलेला दोन नंबरचा हा ध्वज आहे. प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला ध्वजाचे अनावरण करण्यात आले होते. या राष्ट्रध्वजाचे कापड 120 बाय 80 असून वजन 80 किलो आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला की ध्वजाची शिलाई उसविली जाते. शिलाई उसवल्यामुळे आतापर्यंत अनेकदा हा ध्वज उतरविण्यात आला आहे.

-Ads-

पावसाळा वगळून वर्षभरातील आठ महिने हा ध्वज फडकत राहिल, याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 1 ऑक्‍टोबरला हा ध्वज पुन्हा फडकवून ट्रायल घेण्यात आली होती. त्यानंतर हा ध्वज पुन्हा उतरविण्यात आला आहे. कर्नाटकमधील व वाघा बॉर्डरवरील मोठ्या उंचीच्या स्तंभावरून हा ध्वज उतरविणे व पुन्हा फडकविण्याचे काम दोन एजन्सीमार्फत केले जाते. त्यामध्ये स्तंभावर ध्वज फडकविणे आणि उतरविण्याबरोबरच ध्वजाची देखभाल व काळजी घेण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाणार आहे. याकरिता निविदादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय ध्वजसंहितेचा भंग न करता ध्वजाच्या आकारातदेखील बदल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सहा राष्ट्रध्वजाची खरेदी
सध्या या ध्वजाची देखभाल करण्याची जबाबदारी अ प्रभाग कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग अथवा अन्य कारणामुळे या ध्वजाची शिलाई उसविल्यास तत्काळ दुसरा ध्वज फडकविण्यासाठी सहा राष्ट्रध्वज खरेदी करण्यात आले आहेत. राष्ट्रध्वज फडकविण्याची निविदा प्रसिद्ध होऊन, ते काम सुरु होईपर्यंत ध्वज फडकविणे व देखभालीची जबाबदारी अ प्रभागाची असणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)