राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा : जिल्हाधिकारी

सातारा दि. 24 (प्रतिनिधी)
राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून प्रजासत्ताक दिनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

गृह विभागाने 1 जानेवारी रोजी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. दरवर्षी प्रजासत्ताक, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेलेकागदी राष्ट्रध्वज तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्याठिकाणी इतस्तत: पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळेराष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीयध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत तरतूद केलेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमुद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे.कोणीही प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचावापर करु नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमुद केल्यानुसारच करावा. खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशा प्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सुर्यास्तानंतर व सुर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नष्ट करावेत. हे करतांना उपस्थित सर्वांनी उभे रहावे व ते पूर्णपणे जळून नष्ट होईपर्यंत ती जागासोडू नये.

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन तसेच महाराष्ट्र दिन या समारंभावेळी स्थानिक जनतेमार्फत राष्ट्रप्रेम दर्शविण्यासाठी छोटया- छोटया राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो.राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 कलम 2 नुसार कारवाई करण्यात येते. काहीवेळा समारंभात वैयक्तिक वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी पडलेले, विखुरलेले आढळतात.हे दृश्‍य राष्ट्र प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाच्या वापरानंतर एकतर त्याचा योग्यमान राहील याप्रमाणे ठेवण्यात यावेत. अन्यथा जर राष्ट्रध्वज खराब झालेले असतील तर त्याचा योग्य तो मान राखुन ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करावेत. अशा प्रसंगी असे रस्त्यात पडलेले, विखुरलेले राष्ट्रध्वज जर प्लॅस्टिकचे असतील तर प्लॅस्टिकबरेच दिवस नष्ट होत नसल्याने असे ध्वज बरेच दिवस त्या ठिकाणी दिसतात.

राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याच्या केंद्रशासनाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता नाही. जनतेच्या वैयक्तिक वापरासाठी छोटया कागदी ध्वजाचा वापर करण्यात यावा तथापी, अशा कागदीध्वजाचा वापर करताना त्याचा योग्य तो मान राखणे आवश्‍यक आहे तसेच असे राष्ट्रध्वजरस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देऊ नये, असे राष्ट्रध्वज खराब झालेले आहेत, असेआढळल्यास ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्यात यावेत. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान कोणतीही बेवारस वस्तू,लहान मुले, संशयास्पद हालचाली, समाजविघातक व्यक्ती यांची माहिती पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षाला (20162/100,233833) या क्रमांकावर तसेच 9011181888 या हेल्पलाईन क्रमांकावर कळवण्याचे आव्हान जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)