राष्ट्रतेज सेनेच्या वाहतूक आघाडी शाखेचे उद्‌घाटन

चिंचवड – राष्ट्रतेज सेनेच्या वाहतूक आघाडी चिंचवड शाखेचे उद्‌घाटन माजी महापौर आझम पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रतेज सेना, वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी गफूर कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे.

संघटनेच्या माध्यमातून वाहतूक संबंधातील विविध प्रश्नांसाठी लढा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अमोल थोरात यांनी म्हटले आहे. यावेळी भाजप प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक प्रमोद कुटे, शैलेश मोरे, जगदिश शेट्टी, झिसान सय्यद आदी उपस्थित होते. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्याध्यक्षपदी ताहीर भालदार यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य प्रवीण यादव, सचिन ठोंबरे, युसूफ कुरेशी, जाफर मुल्ला, अदिनाथ मुळगे, इम्रान बिजापुरे, अक्षय यादव कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संघटनेच्या उदिष्ट व ध्येयधोरणाबाबत माहिती देताना अमोल थोरात म्हणाले की, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील चालकांना संघटीत करून परिवहन कार्यालय व शासनांशी संबधित त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेची बांधणी करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)