नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी वेटलिफ्टर पूनम यादव हिच्यावर आणि तिच्या सहकाऱ्यांवर काही लोकांनी हल्ला केला आहे. बनारसपासून 30 किलोमीटर दूर मुंगवार गावातली ही घटना आहे. पूनम मुंगवारला तिच्या नातेवाईकाकडे गेली होती. त्यावेळी गावातल्या काही लोकांनी तिच्यावर आणि तिच्या नातेवाईकांवर हल्ला केला.

गावचा सरपंच आणि त्याच्या सहकार्याने काही वाहनांमध्ये तोडफोड देखील केली आहे. गावातील एका जमिनीवरुन हा वाद झाल्याचा बोलले  जात आहे. पूनमवर हल्ला झाल्यानंतर पोलीस देखील सतर्क झाल्या. शनिवारी दोन्ही बाजुच्या लोकांना बोलवण्यात आले होते. पूनमचे पिता आणि इतर काही नातेवाईकांसोबत पूनम देखील होती. पोलिसांनी तिला या हल्ल्यातून वाचवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)