राष्ट्रकुल स्पर्धेत सायनाची बाजी…

सायनाला सुवर्ण, सिंधूला रौप्य 
गोल्ड कोस्ट – भारतीय बॅडमिंटनमधील दोन स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या दोघी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यांत एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. या निर्णायक लढतीत सायनाने देशातील अव्वल खेळाडू आणि ऑलंपिक पदक विजेत्या सिंधूला हारवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सायना नेहवालने आक्रमक खेळी करत दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

आजच्या सामन्यात सायना नेहवालने आक्रमक खेळी करत पी. व्ही. सिंधूचा 21-18, 23-21 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. या सामन्यात सायना नेहवालला पी. व्ही. सिंधूने सुद्धा कडवी झुंज दिली. दोघींच्या या कामगिरीमुळे सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके भारताच्या खात्यात आली आहेत. त्यामुळे भारताकडे आता 26 सुवर्ण आणि 17 रौप्य पदके आली आहेत.

दरम्यान, शनिवारी उपांत्य फेरीत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या दोघींनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. 22 वर्षीय ऑलिम्पिक रौप्यपदकविजेती सिंधू टाचेच्या दुखापतीमुळे मिश्र सांघिक स्पर्धेत खेळू शकली नाही. तिने गतविजेती मिशेल लीचा 21-18, 21-8 ने पराभव केला. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू सायना नेहवालने 2014 ची रौप्यपदक विजेती ख्रिस्टी गिलमोरची झुंज 21-14, 18-21, 21-17 ने मोडून काढली. या दोघींनीही अंतिम फेरी गाठल्यामुळे भारताचे सुवर्ण व रौप्यपदक निश्‍चित झाले होते.
2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेची चॅम्पियन सायना व 2014 ची कांस्यपदकविजेती सिंधू यांच्यादरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये अंतिम लढत झाली होती. त्यात सायना नेहवालने बाजी मारली होती.

बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतला पराभवचा सामना करावा लागला. बॅटमिंटममध्ये अव्वल स्थानावर असेल्या किदम्बी श्रीकांतचा मलेशियाच्या ली चोंग वेईने 2-1 अशा फरकाने पराभव केला. सामन्यात वेईने 19-21, 21-14, 21-14 अश्‍या गुणांनी श्रीकांतला मात दिली. एक तास पाच मिनिटांपर्यंत हा सामना रंगला होता. श्रीकांतच्या या पराभवामुळं भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले आहे. श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. भारताकडे आता 26 सुवर्ण आणि 19 रौप्य पदके आहेत. चोंग वेईने श्रीकांतचा 21-19 , 14-21 आणि 14-21 असा पराभव केला. तसेच पुरुष दुहेरीतील सामण्यात सात्विक रॅंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीयांनी रौप्य पदक पटकावले. सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीचा इंग्लंडच्या मार्कस एलिस आणि ख्रिस लॅंग्रीज या जोडीने 13-21, 16-21 असा सरळ सेट मध्ये पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)