राष्ट्रकुल स्पर्धा : स्क्वॉश महिला दुहेरीत दीपिका पल्लीकल आणि जोशना चिनप्पा यांना रौप्य 

महिला दुहेरीत भारताच्या दीपिका पल्लीकल आणि जोशना चिनप्पा या जोडीचा स्क्वॉशच्या अंतीम फेरीत न्युझिलंडच्या जोएल्ले किंग आणि अमांडा मर्फी यांनी 9-11, 8-11 असा सहज पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्यामुळे दीपिका आणि जोशना या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दीपिका आणि जोशना या जोडीने 2014 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक कमावले होते. अंतिम सामन्यात पंचांच्या काही निर्णयांवर दीपिका आणि जोशना या नाराज होत्या. त्यांच्या मते सामन्यात पंचांनी काही चुकीचे निर्णय दिले त्याचा फटका या भारतीय जोडीला बसल्याने त्यांचे सुवर्णपदक हुकले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)