राष्ट्रकुल स्पर्धा ; सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूमध्ये सुवर्णपदकासाठी लढत

गोल्ड कोस्ट : बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूमध्ये सामना होणार आहे. उपांत्य फेरीतील सामने जिंकत दोघींनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता सुवर्णपदकासाठी त्यांच्यात सामना होईल. या सामन्यात विजेत्याला सुवर्णपदक तर पराभूत होणाऱ्या खेळाडूला रौप्यपदक मिळणार आहे. यामुळे भारताची दोन पदके निश्चित झाली आहेत.

सायनाने उपांत्य सामन्यात स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा २१-१४, १८-२१, २१-१७ अशा तीन सेटमध्ये पराभव केला. सायनाने पहिला सेट सहज जिंकला. पण दुसरा सेट गमवला. मात्र, सायनाने जोरदार पुनरागमन करत तिसरा सेट २१-१७ने जिंकत सामनाही जिंकला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात पी. व्ही. सिंधूने कॅनडाच्या मिशेलेचा दोन सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट जिंकण्यासाठी सिंधूला संघर्ष करावा लागला. मात्र, दुसरा सेट एकतर्फी जिंकत सिंधूने सामना जिंकला. सिंधून मिशेलेचा २१-१८, २१-८ अशा दोन सेटमध्ये पराभव केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)