गोल्ड कोस्ट  : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आता दोन डझन सुवर्णपदके जमा झाली आहेत. टेबल टेनिसपटू मनिका बत्रानं ‘गोल्डन स्मॅश’ लगावला आहे. इंग्लंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव करत मनिकाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

पहिल्या गेममध्ये १-६ अशी पिछाडीवर पडलेल्या मनिकाने झुंजार पुनरागमन केले आणि हा गेम ११-७ ने जिंकला. त्यानंतर तिचा आत्मविश्वास इतका उंचावला की, इंग्लंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला डोकं वर काढण्याची संधीच तिने दिली नाही. पुढचे तीनही गेम खिशात टाकत तिने सुवर्णपदक जिंकले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)