राष्ट्रकुल स्पर्धा : मनिका बत्राला दुहेरीत कांस्यपदक 

शरथ कमललाही एकेरीत कांस्यपदक 
गोल्ड कोस्ट – भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये ऐतिहासीक कामगिरीची नोंद करत चौथे पदक पटकावले आहे. मनिकाने मिश्र दुहेरीत साथियनच्या साथीततीने कांस्यपदक पटकावले आहे. टेबल टेनिसच्या एकेरी प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई करणारी मनिका बत्रा पहिलीच भारतीय खेळाडू ठरली तर भारतीय महिलांनी सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई करुन दिल्या नंतर महिला दुहेरीच्या सामन्यात मौमा दासच्या साथीने खेळताना मनिकाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता, यामुळे भारताला या प्रकारात रौप्यपदक मिळाले होते. त्यानंतर आता मनिकाने मिश्र दुहेरीत साथियनच्या साथीततीने कांस्यपदक पटकावताना स्पर्धेतील आपले चौथे पदक मिळवले आहे. तर दुसरीकडे शरथ कमलने पुरुष एकेरीच्या सामन्यात कांस्यपदक पटकावले आहे या पदकाने त्याने या स्पर्धेत तीन पदक पटकावले आहेत.

मिश्र दुहेरीत कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात मनिका आणि साथीयनया भारतीय जोडीने भारताच्याच शरथ कमल आणि मौमा दासया जोडीचा 11-6, 11-2, 11-4 असा सरळ सेट मध्ये पराभव केला. या विजया मुळे मनिकाने स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक प्रकारात पदकाची कमाई करत ऐतिहासीक कामगीरी केली आहे. दुसरीकडे पुरुष एकेरीच्या सामन्यात शरथ कमलने इंग्लंडच्या सॅम्युअल वॉकरचा 4-1 असा एकतर्फी पराभव केला. सामन्यात शरथने 11-7, 11-9, 9-11, 11-6, 12-10 अश्‍या गुणांनी विजय मिलवत स्पर्धेतील आपले तिसरे पदक मिळवले. शरथ आणि मनिकाच्या या कामगिरीने भारताच्या 10 खेळाडूंच्या टेबल टेनिस संघाने 8 पदक मिळवले आहेत. ज्यात 3 सुवर्ण 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताच्या या कामगीरीने भारत राष्ट्रकुल 2018 मध्ये टेबल टेनिस मध्ये सर्वाधिक पदक मिळवणाऱ्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)