गोल्ड कोस्ट:  राष्ट्रकुल स्पर्धेतील आजचा नववा दिवस भारतीयांसाठी अतिशय चांगला ठरला आहे. कारण नेमबाजांनी एकीकडे सुवर्ण आणि रौप्यपदकावर आपला निशाणा साधला. तर दुसरीकडे ९१ किलो वजनी गटात भारताच्या नमन तंवरला कांस्य पदक मिळाले आहे. त्याचा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या के. जेसनकडून पराभव झाल्याने त्याचे सुवर्ण पदकाकडे टाकण्याची वाट अर्धवट राहिली.

दरम्यान,फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात पूजा धांडाची अंतिम फेरीत धडक मारली आहे. कॅमरुनच्या टियाकोचा ११-५ असा पराभव करत पूजाने अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान, आज सकाळी नेमबाजीत २५ मीटर रॅपिड फायरमध्ये अनिश भानवालाने सुवर्ण पदक जिंकले. तर, महिला नेमबाजीत ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये तेजस्विनी सावंत, अंजूम मोद्रूल यांनी सुवर्ण व रौप्य पदक मिळवले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)