राष्ट्रकुल स्पर्धा : नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सर गौरव सोळंकीने पटकावले सुवर्णपदक

गोल्ड कोस्ट- राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशीही पदकाची लयलूट चालूच असून मेरी कोम पाठोपाठ नेमबाज संजीव राजपूत आणि बॉक्सर गौरव सोळंकी यांनी सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे.

नेमबाज संजीव राजपूत याने पुरूषांच्या ५० मीटर ३ रायफल पोझिशनमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. तर बॉक्सिंगमध्ये गौरव सोळंकीने ५२ किलोवजनी गटात सुवर्ण कामगिरी केली आहे. गौरवने उत्तर आयर्लंडचा ब्रेंडन इरविनचा प्रभाव करत सुवर्ण पदक आपल्या नावे केले.

दरम्यान , बॉक्सिंगमध्ये मनीष कौशिक याने ६० किलो वजनी गटात रौप्य पदक मिळविले आहे. तर ४६-४९ वजनी गटात बॉक्सर अमित पंघाल यानेही रौप्यपदक पटकाविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)