राष्ट्रकुल बॅडमिंटन स्पर्धा; सायना-सिंधू अंतिम लढत रंगणार

 सुवर्णपदकासाठी श्रीकांतसमोर ली चोंग वेईचे आव्हान

गोल्ड कोस्ट – पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या अव्वल भारतीय खेळाडूंमध्ये 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील महिला बॅडमिंटनच्या सुवर्णपदकासाठी अंतिम लढत रंगणार आहे. भारताच्याच दोन खेळाडू एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याने सुवर्ण आणि रौप्यपदक निश्‍चित झाले आहे. लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेत्या सायना नेहवालने उपान्त्य सामन्यात स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमूरला 21-14, 18-21, 21-17 असे 68 मिनिटांच्या लढतीनंतर पराभूत केले. दुसऱ्या उपान्त्य सामन्यात रिओ ऑलिम्पिक रौप्यविजेत्या सिंधूने कॅनडाच्या गतविजेत्या मिचेली ली हिच्यावर 21-18, 21-8 असा केवळ 26 मिनिटांत सहज विजय मिळवला.

दरम्यान पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांत विरुद्ध ली चोंग वेई अशी अंतिम लढत होईल. पहिल्या उपान्त्य सामन्यात किदंबी श्रीकांतने 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यविजेत्या इंग्लंडच्या राजीव औसेफचा केवळ अर्ध्या तासात 21-10, 21-17 असा एकतर्फी पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र दुसऱ्या उपान्त्य सामन्यात भारताच्या प्रणयला तीन वेळच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ली चोंग वेईविरुद्ध 16-21, 21-9, 14-21 असा पराभव पत्करावा लागला.
भारताच्या सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

राष्ट्रकुलच्या इतिहासात पदक मिळवणारी पहिली भारतीय जोडी ठरण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. सात्विक-चिराग यांनी उपान्त्य सामन्यात श्रीलंकेच्या सचिन दिआस आणि भुवनेका गुणतिलका यांचा 21-18, 21-10 असा पराभव केला. अंतिम सामन्यात सात्विक आणि चिराग यांचा सामना मार्कस एलिस आणि ख्रिस लॅंग्रीज या ऑलिम्पिक रौप्यविजेत्या जोडीशी होणार आहे. महिला दुहेरीत भारताच्या अश्‍विनी पोनाप्पा आणि सिक्की रेड्डी यांचा मलेशियाच्या मेइ कुआन चोव आणि विविअन हू यांच्नी 21-17, 15-21, 4-21 असा पराभव केला. त्यांना आता कांस्यपदकाची संधी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)