राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी वैष्णवी सुतारची निवड

कोल्हापूर – ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपंग टेबल टेनिसपटू वैष्णवी विनायक सुतार हिची निवड झाली आहे. चार ते पंधरा एप्रिल दरम्यान स्पर्धा होत आहे. ती उद्या  ऑस्ट्रेलियाला रवाना होणार  आहे.पँरा टेबल टेनिसमधून देशातील फक्त दोन खेळाडूंची निवड झाली आहे. त्यांपैकी सुतार या कोल्हापूरच्या कन्येने आंतरराष्ट्रीय रँकिंगच्या जोरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला आहे. इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन (IOA), स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडीया (SAI) व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियातर्फे (TTFI) निवड करण्यात आली.

तिने आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन कास्यपदक, ६ राष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्ण, तर  २ रजत पदक मिळवले आहे. महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय कास्यपदक विजेती अपंग (पॅरा) टेबल टेनिसपटू बनण्याचा मान देखील तिनं  मिळवला आहे. तिचे आंतरराष्ट्रीय मानांकन २१ व एशियन मानांकन ११ आहे  याच मानांकनाच्या जोरावर तिची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)