राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार

दुबई: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेट चा समावेश करण्यात यावा, याबाबत गेले अनेक वर्षे नुसतीच चर्चा सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. पण आता बर्मिंगहॅम येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत टी 20 महिला क्रिकेटचा समावेश करण्यात यावा यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अर्ज सादर केला आहे.

आयसीसीने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्या यजमानपदाखाली संयुक्तरित्या याबाबत अर्ज केला आहे. याआधी 1998 मध्ये क्वालांलपूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत क्रिकेट खेळाचे दर्शन झाले होते. आता बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जगभरात क्रिकेटला प्रोत्साहन देणे, महिला आणि मुलींचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने महिला क्रिकेटचा राष्ट्रकूलमध्ये समावेश करण्यासाठी आयसीसीचे प्रयत्न सुरू आहेत. जगभरात क्रिकेटचा मोठा चाहतावर्ग आहे.

त्यामुळे महिला क्रिकेटचा राष्ट्रकूलमध्ये समावेश केल्यास क्रिकेटसह राष्ट्रकूल संघटनेला ही त्याचा फायदा होईल, असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी म्हटले आहे. क्रिकेटला एका उच्च स्तरावर नेण्यासाठी विविध संस्कृती आणि वारसा असलेले बर्मिंगहॅम हे योग्य ठिकाण आहे. या शहराचे क्रिकेटशी नाते घट्ट आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)