राष्ट्रकुलाचे नेतृत्व प्रिन्स चार्ल्सकडे जाण्याचे संकेत

  महाराणी एलिझाबेथ यांनी राष्ट्रकुलातील नेत्यांना केले सहकार्याचे आवाहन

लंडन – राष्ट्रकुल संघटनेचे नेतृत्व ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे दिले जाण्याचे संकेत आहेत. संघटनेच्या प्रमुखपदी आपला वारस म्हणून प्रिन्स चार्ल्स यांची नियुक्‍ती व्हावी, असे आवाहन महाराणी एलिझाबेथ यांनी राष्ट्रकुल देशांच्या नेत्यांना केले आहे. त्यांचे हे आवाहन म्हणजे 53 देशांच्या राष्ट्रकुल संघटनेतील वारसदार नियुक्तीच्या परंपरेत थेट हस्तक्षेप समजला जात आहे.

91 वर्षीय वयोवृद्ध महाराणी एलिझाबेथ यांनी आपले पुत्र प्रिन्स चार्ल्स यांची राष्ट्रकुलाच्या अध्यक्षपदासाठी जोरदार शिफारस केली आहे. प्रिन्स चार्ल्स हे एक दिवस या संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारावे, असे आवाहन राष्ट्रकुल सदस्य देशांच्या “चोगम’बैठकीच्या उद्‌घाटनाच्यावेळी केले. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित आहेत.
राष्ट्रकुल प्रमुखाचे पद हे अनुवंशिक नाही. महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर ते पद आपोआप 69 वर्षीय युवराज चार्ल्स यांच्याकडे जाणार नाही. राष्ट्रकुलातील 53 देशांचे बकिंगहॅम येथील राजप्रासादात जमा झालेले नेते उद्या संघटनेच्या नेतृत्वाबाबत निर्णय घेणार आहेत.

उद्‌घाटनाच्या भाषणामध्ये महाराणी एलिझाबेथे यांनी राष्ट्रकुलाची ताकद दरवर्षी अधिकाधिक वाढत असल्याचे सांगितले. राजघराण्याकडून मिळणाऱ्या स्थिरतेचा वारसा संपूर्ण जगाला फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षाही महाराणी एलिझाबेथ यांनी व्यक्‍त केली. आपल्या वडिलांनी 1949 साली सुरूवात करून दिलेल्या राष्ट्रकुलाची जबाबदारी एकदिवस प्रिन्स ऑफ वेल्स उचलतील, अशी ईच्छा त्यांनी “चोगम’च्या उद्‌घाटनाच्या भाषणात व्यक्‍त केली.राजघराण्याव्यतिरिक्‍त अन्य व्यक्‍तीकडे राष्ट्रकुलाच्या नेतृत्वाची जबाबदारी यावी आणि वसाहतवादाच्या मूळांपासून दूर जाण्याची ही संधी राष्ट्रकुल सदस्यांना असल्याचे मत काही तज्ञांकडून व्यक्‍त होत आहे. मात्र ब्रिटीश साम्राज्यातील वसाहतीतील गटांवर राजघराण्याचेच वर्चस्व आजही अबाधित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)