राष्टीय क्रीडादिनानिमित्त क्रीडापटूंचा सत्कार

पिंपरी- राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून अजिंक्‍य क्रिकेट क्‍लबच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या सत्कारार्थीमध्ये रविंद्र पिल्ले (फुटबॉल), एडवर्ड डिसोजा (हॉकी), जयश्री साळवे (कबड्डी), सुभाष राणे (क्रीडा सामाजिक कार्यकर्ते) आणि नंदू वाळके यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. नेहरुनगर येथील हॉकी स्टेडियमवर पार पडलेल्या या कार्यक्रमाला आंबेडकर कमिटीचे सचिव वंसत मोरे, रज्जाक पानसरे, अमिताभ केदारी, मनोज कदम, विष्णू चौडेया,श्रीधरन तंम्बा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)