रावेतमधील स्मशानभूमीला नागरिकांचा विरोध

पिंपरी – रावेत येथील सेक्‍टर 32 अ मध्ये उभारण्यात येत असलेल्या स्मशानभूमीला स्थानिक रहिवाशांसह राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांनीही विरोध केला आहे. रहिवासी झोनमध्ये स्मशानभूमीची उभारणी केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

प्राधिकरणाने रावेत येथील सेक्‍टर 32 अ, आरक्षण क्रमांक 596 ही जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित केली आहे. 9125.60 चौरस मीटर जागेतील स्मशानभूमीत वायुप्रदूषण नियंत्रण यंत्रणेसह गॅसवर आधारित आधुनिक शवदाहिनी उभारण्यात येत आहे. त्यासाठी 4 कोटी 62 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, या जागेजवळील सोसायट्यांमधील नागरिकांनी या स्मशानभूमीला विरोध दर्शविला आहे. रहिवासी झोनपासून केवळ 30 मीटर अंतरावर स्मशानभूमी असावी असा नियम असताना हा नियम फाट्यावर मारुन स्मशानभूमीचे काम सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर राहुल जाधव यांनी स्मशानभूमी पाहणी दौऱ्यांतर्गत नुकतीच या स्मशानभूमीच्या कामाची महापालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली. या वेळी परिसरात राहणाऱ्या शेकडो महिला आणि नागरिकांनी येथे स्मशानभूमी करू नये अशी मागणी करीत नियोजित स्मशानभूमीच्या कामाला विरोध केला. महापौरांसोबत नागरिकांनी याबाबत सविस्तर चर्चा केली. नगरसेविका संगीता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर उपस्थित होत्या. वास्तुशास्त्रानुसार घराजवळ स्मशानभूमी असू नये, ते आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक
सेक्‍टर 32 मध्ये काही वर्षांपूर्वी विविध व्यावसायिकांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या. नव्याने विकसित होणारा आणि शांत परिसर म्हणून अनेकांनी या भागाला पसंती देत लाखो रुपये देऊन घरे घेतली. व्यावसायिकाने येथील आजूबाजूला असलेल्या आरक्षणाबाबत पुसटशीसुद्धा कल्पना येथे घर देणाऱ्याला दिली नाही. आता येथे स्मशानभूमीचे काम सुरू केल्यानंतर रहिवाशांना याबाबत समजले. बांधकाम व्यावसायिकाने जाणिवपूर्वक अंधारात ठेवल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)