रावसाहेब मुसळे गुणवंत नाईक पुरस्काराने सन्मानित

टाकळी हाजी- शिरूर तालुका मुख्याध्यापक शिक्षक संघ आणि पंचायत समिती शिरूर यांच्या वतीने दिला जाणारा तालुकास्तरीय गुणवंत नाईक पुरस्कार म्हसे बुद्रुुक येथील रावसाहेब तुळशीराम मुसळे यांना डॉ. अशोक भोसले माध्यमिक शिक्षण मंडळ सचिव (महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते देण्यात आला. बापूसाहेब गावडे माध्यमिक विद्यालय म्हसे बुद्रुक या संस्थेत 20 वर्ष आदर्श काम केल्याबद्दल तालुकास्तरीय गुणवंत नाईक पुरस्कारने त्यांना सन्मानित केले. माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनिता गावडे, पंचायत समितीच्या सदस्या अरुणा घोडे, सरपंच दामू घोडे, प्राचार्य आर.बी.गावडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनभाऊ मुसळे यांसह सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)