रावल यांच्याकडे 800 एकर जमिन…

मुंबई – 1976 मध्ये भूसंपादन कायदा आल्यानंतर एखादयाकडे 50 ते 52 एकरच्यावर जमीन ठेवता येत नसताना जयकुमार रावल यांच्याकडे दोंडाई येथे वेगवेगळी कुटुंब दाखवत 800 एकर जमीन उपलब्ध आहे. इतका मोठा भूसाठा कसा. यांची जमीनीची भूक संपत नाही हे यावरुन दिसत आहे.

जयकुमार रावल यांचे दोन जिल्हयामध्ये भूमाफियासारखे काम सुरु आहे. शेतकऱ्यांची जमीन कवडीमोलाने खरेदी करायची आणि करोडो रुपयांनी विकायची असा धंदा रावल आणि कंपनीचा सुरु असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला.

-Ads-

मुख्यमंत्र्यांनी केली पाठराखण…
रावल यांच्याबाबत लेखी तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत परंतु मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करत आहेत. शिवाय एसीबीवरही कारवाई न करण्याबाबत दबाव आणत आहेत असाही आरोप नवाब मलिक यांनी केला. एकनाथ खडसे यांना एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात मंत्रीमंडळातून काढण्यात आले मग रावल यांच्याविषयी तक्रारी असून मुख्यमंत्री का कारवाई करत नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दयायला हवे आणि खडसेंना जो न्याय लावला तोच न्याय रावल यांना लावणार का असा सवालही नवाब मलिक यांनी केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)