रावण टोळीचा डाव उधळला

पिंपरी – रावण टोळीचा म्होरक्‍या अनिकेत जाधव याचा महाकाली आणि सोन्या काळभोर टोळीने खून केला होता. त्याच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या नावाखाली दहशत निर्माण करण्याचा रावण टोळीचा डाव होता. मात्र पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळून लावला.

गेल्या महिन्यात रावण टोळीचा म्होरक्‍या अनिकेत जाधव याचा वाढदिवस होता. त्यावेळी रावण गॅंगच्या सदस्यांनी तलवारीने केक कापत परिसरात दहशत निर्माण केली होती. मात्र त्यावेळी पोलिसांना वेळेवर माहिती मिळाली नाही. पोलिसांना माहिती मिळाल्यावर वाढदिवस साजरा करणारेही पळून गेले होते. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. या टोळीतील काही सदस्य इतर राज्यात पळून गेले आहेत.

-Ads-

अनिकेत जाधव याचा 20 नोव्हेंबर रोजी खून झाला होता. त्यांच्या स्मृतिदिनाच्या नावाखाली पुन्हा दहशत निर्माण करण्याचा रावण टोळीचा डाव होता. याबाबत पोलिसांना कुणकूण लागली होती. म्हणून ज्या ठिकाणी त्याचा खून झाला होता तिथे पोलिसांनी गस्त ठेवली. मात्र, रावण टोळीच्या सदस्यांना अनिकेत जाधवचा ज्याठिकाणी खून झाला त्या ठिकाणी येऊ द्यायचे आणि मग त्यांची धरपकड करायची, अशी व्यूहरचना ठरल्याने पोलिसांनी त्या ठिकाणची गस्त बंद केली. मात्र पोलीस सतर्क असल्याचे पाहून या टोळीतील सदस्य घटनास्थळाकडे फिरकलेच नाहीत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)