“रावण’वाणीचा महासभेत “समाचार’

पिंपरी – नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात मुंबईतील घाटकोपरचे आमदार व भाजप प्रवक्‍ते राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद गुरुवारी (दि. 6) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेत उमटले. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी “रावण’वाणीचा चांगलाच “समाचार’ घेतला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी राम कदम यांच्या निषेधाची मागणी करत चांगलाच गोंधळ घातला. आमदार राम कदम दरवर्षी दहीहंडी उत्सव दणक्‍यात करतात. “सेलिब्रिटीं’ची हजेरी त्याला असते. यावेळी, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. ते येण्यापूर्वी कदम यांनी भाषण केले. मतदारांची कुठली कुठली कामे करू, असे सांगताना त्यांनी मुलींविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्य केले होते. एखाद्या तरुणाला नकार दिलेल्या तरुणीला पळवून आणून मी त्याला मदत करीन, असे वक्‍तव्य कदम यांनी केले होते. त्यामुळे राज्यभरातून भाजप आणि राम कदम यांच्या टीका होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी सुरूवातीलाच भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या वक्‍तव्याचा निषेध केला. कदम यांच्यावर सभागृहाच्या वतीने निषेध करण्याची त्यांनी मागणी केली.

महापौरांच्या “डायस’वर धाव
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली घोडेकर यांनी राम कदम यांच्या प्रवृत्तीचा धिक्कार व्यक्त करत निषेधाचा ठराव सभागृहात मांडला. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनीही निषेधार्थ घोषणा दिल्या. मात्र त्यावरून सभागृहात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, महापौर राहुल जाधव यांना ही निषेधाची मागणी सभागृहात करू नये, असे वक्तव्य केले. त्यावरून विरोधकांनी महापौरांच्या डायसवर धाव घेतली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)