देऊळगावराजे-रावणगाव-बोरीबेल-देऊळगावराजे या 16 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी राज्य विधिमंडळाच्या सन 2018 -2019 च्या अर्थसंकल्पात सुमारे 2 कोटी 63 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती दौंड तालुक्याचे आमदार ऍड. राहूल कुल यांनी दिली.
नुकताच राज्याचा सन 2018-19 चा अर्थसंकल्प विधानमंडळात सदर करण्यात आला. यावेळी आमदार ऍड. कुल यांनी दौंड तालुक्यातील शेतकरी, नागरिक यांची दळणवळणाची सोय आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता तालुक्यातील विविध रस्त्याच्या कामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामध्ये एकूण 14 रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यामध्ये या रस्त्यासाठी देखील 2 कोटी 63 लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे. या रस्त्यामुळे रावणगाव, बोरीबेल, देऊळगाव राजे रा गावातील सुमारे 16 किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण आणि सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. अशाप्रकारे दौंड तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणवर निधी खेचून आणणार आपण आग्रही राहणार असून येत्या काही दिवसांत या कामाची निविदा प्रकिया पूर्ण होऊन लवकरच या कामाला सुरूवात होईल, असे आमदार ऍड. कुल यांनी सांगितले आहे. या होत असलेल्या सर्वच विकासकामांबाबत नागरिकांनी जागृत राहून काम दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील आमदार ऍड. कुल यांनी यावेळी केले.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा