रावणगाव परिसरात मनमोहक किल्ले

रावणगांव- दिवाळीची सुटी लागल्याने रावणगांव आणि परिसरातील बालकलाकारांनी सुरेख आणि मनमोहक गड-किल्ले तयार केले आहेत. परिसरातील विद्यार्थी दिवाळीची सुटी लागल्याने आनंदित झालेली असून त्यांच्या जोडीला रावणगांवमध्ये मामाच्या गावाला आलेली मुले देखील आहेत. हा सर्व बालकलाकार परिसरातील लाल माती गोळा करून त्या मातीपासून मनमोहक अस गडकिल्ले तयार करण्यात दंग आहे. या किल्ल्यांची रचना अतिशय सुरेख आहे.डोंगर उभारताना त्याचा आकार, त्याचा कोन, उंची, लांबी या सर्व गोष्टींचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले आहे. महादरवाजा, खुबलढा बुरुज, चोरदिंडी, हत्ती तलाव, बाजार, मंदिर, टकमक टोक, हिरकणी टोक अशा अनेक गोष्टींचा समावेश बालकराकारांनी यात केला आहे. विशेष म्हणजे गडावरील वनसंपदा हुबेहुब दिसावी म्हणून त्यांनी सर्वाधिक मेहनत घेतली. गडाच्या तुलनेत सैन्यदल, राहुट्या, पायऱ्या यांची उंची व आकारही त्यांनी निश्‍चित केला आहे, त्यामुळे अत्यंत देखणा असा किल्ला त्यांनी साकारला. आधुनिक तंत्राचा वापर करीत बालकलाकारांनी किल्ला साकारल्याने तो लक्षवेधी ठरला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)