रावणगावतील शाळा कोसळण्याचा धोका

  • जिल्हा परिषद शाळेतील स्थिती; ग्रामपंचायतीचा जि.प.कडे ठराव

रावणगाव – रावणगाव (ता. दौंड) येथील गावठाणातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. रावणगाव गावठाणातील ही सर्वात जुनी शाळा आहे. येथे कोठेही शिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती त्यावेळी येथे ही शाळा सुरू झाल्याने अनेक जुने-जाणते विद्यार्थी येथे घडले आहेत.
यामुळे या शाळेला परंपरेसह इतिहासही आहे, असे असताना या शाळेच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. सध्या, जीर्ण झालेल्या सहा ते सात वर्ग खोल्या केंव्हाही कोसळू शकतात. यामुळे येथे दुर्घटना घडण्याचाही धोका आहे.
रावणगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मिळणारे शिक्षण हे गुणवत्तापुरक मानले जात होते. परंतु, सध्या येथील गुणवत्ता घसरत चालली आहे. यासह येथे मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांमुळेही पालकांचाही इतर शाळांकडे ओढा वाढला आहे.
याबाबत गावातील तरुणांनी सोशल मीडियावर आवाज उठवायला सुरुवात केली आहे. पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेचे पाचवी ते सातवीचे वर्गच येथे बंद आहेत. शाळेतील चिमुरड्यांसाठी नवीन इमारत उभारण्याची घोषणा येथे करण्यात आली होती. मात्र, सध्याची स्थित पाहता हे सर्व स्वप्नच राहणार की काय, अशी स्थिती आहे.

धोकादायक स्थितीतील शाळा पाडण्याचा आदेश जिल्हा परिषदेने केंव्हाच दिला आहे. 14व्या वित्त आयोगातून ही शाळा बांधण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रक्रियाही झाली आहे. संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे.
– प्रकाश नवल, उपसभापती, दौंड

गावठाणातील शाळेची झालेली दुरवस्था लक्षात घेवून ही शाळा पाडण्यासंदर्भातील ठराव रावणगांव ग्रामपंचायतीने केल आहे. शाळा पाडायचा ग्रामसभचा ठराव ग्रामशिक्षण समितीलाही देण्यात आलेला आहे. परंतु, संबंधीत विभागाचे याकामी दुर्लक्ष होत आहे.
– भिमराव खोमण, ग्रामविकास अधिकारी, रावणगांव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)