राळेगणसिद्धी येथे राष्ट्रीय युवा शिबिराचे आयोजनअण्णा हजारे, अमरनाथ भाई, विश्वंभर चौधरी यांची उपस्थिती

पारनेर – वर्धा येथिल राष्ट्रीय युवा संघटनेच्या वतीने राळेगणसिद्धी येथे 23 व्या राष्ट्रीय युवा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिबिराचे संयोजक शिवाजी खेडकर यांनी दिली.
हे शिबिर एक जून ते सात जून या कालावधित पार पडणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अमरनाथ भाई, डॉ. विश्वंभर चौधरी, कुमार प्रशांत इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.सध्या महात्मा गांधीजींच्या जयंतीचे 150 वे वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने युवा जागृतीसाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगीतले.
राळेगणसिद्धी येथिल संत यादवबाबा विद्यार्थी वसतिगृहात होणाऱ्या या शिबिरात विविध राज्यातील 150 तरुण सहभागी होणार असून त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ. विश्वंभर चौधरी हे पर्यावरणासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत तर रोजगार की नोकरी ह्या विषयावर प्रेरणा चौधरी मार्गदर्शन करणार आहेत. राजकारण पक्षांचे की लोकांचे ह्या विषयावर गांधी पिस फाऊंडेशनचे अध्यक्ष कुमार प्रशांत हे मार्दर्शन करणार आहेत. शिबिराचे उद्घाटन अण्णा हजारे यांच्या हस्ते होणार असून सर्वोदय मंडळाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमरनाथ भाई हे शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.सात दिवसांच्या शिबिरात सहभागी होणारे तरुण आपल्या दैनंदिन कार्यक्रमांत पहाटेच्या योगा प्राणायामासोबतच रोज सकाळी दोन तास श्रमदान करून राळेगणसिद्धी ते पिंपळनेर रस्त्याच्या दूतर्फा खड्डे खोदून सामाजिक वनिकरण विभागाच्या सहकार्याने वृक्ष लागवड करणार आहेत. तसेच शिबिरादरम्यान विविध क्रीडा प्रकार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रात्यक्षिकेही होणार असल्याचे संयोजकांनी कळवले आहे. राष्ट्रीय युवा संघटनेचे विश्वजित, मनोज ठाकरे, प्रशांत नागोसे, प्रेरणा देसाई, श्रद्धा बडवाई व शिवाजी खेडकर इत्यादी कार्यकर्ते शिबिराचे नियोजन व व्यवस्था पाहत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)