रायुडूमुळे चौथ्या क्रमांकाचे दडपण नाहिशे – कोहली 

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा तब्बल 224 धावांनी पराभव करताना मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. यावेळी सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अंबाती रायुडूची स्तुती करताना सांगितले की, अंबाती रायुडू हा उत्तम फलंदाज असून आजच्या सामन्यात त्याने केलेल्या खेळीतून तो मधल्या फळीतील उत्तम कामगिरी करणारा फलंदाज असल्याचे दाखवून दिले आहे.

या सामन्यात रोहित शर्माला जरी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला असला तरी रोहित इतकीच महत्वाची खेळी रायुडूने या सामन्यात केली होती. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात विंडीजसमोर 377 धावांचे भले मोठे लक्ष्य ठेवता आले होते. भारतीय संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेगवान सुरुवात करताना 70 धावांची सलामी दिली होती. मात्र, शिखर आणि विराटहे ठराविक अंतराने परतल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला होता. यावेळी सलामीवीर रोहित शर्मा आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेला अंबाती रायुडूयांनी संघाचा डाव सावरताना 211 धावांची भागीदारी केली. त्याच्या बळावर भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2019 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वचषकाला आता काही महिनेच शिल्लक राहिलेले असताना, भारतीय एकदिवसीय संघाची मधल्या फळीतल्या फलंदाजीची चिंता अजुन संपली नव्हती. विशेषकरुन चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोणी करायची आणि मधल्या फळीत फलंदाजीचा भार कोणी सावरायचा यावर भारतीय संघ अनेक प्रयोग करत होता ज्यात मनिष पांडे, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या यांच्यासह तब्बल 12 खेळाडूंना चौथ्यास्थानासाठी संधी दिली गेली होती. मात्र, त्यावेळी यात प्रत्येकालाच अपयश आले होते. त्यामुळे चौथ्या स्थानावर कोण फलंदाजी करणार याची चिंता विराट सह संघ व्यवस्थापनाला होती. त्यातच रायुडूने चौथ्या एकदिवसीय सामन्यात 80 चेंडूंमध्ये 100 धावांची खेळी करत संघाचा दाव सावरला. विशेष म्हणजे ज्यावेळी रायुडू फलम्दाजीला उतरला त्यावेळी त्याला सावध फलंदाजी करने गरजेचे होते. आणि त्याने त्याच प्रकारे फलंदाजी केली. आणि त्यानंतर संघ दबावातून बाहेर पडल्यानंतर त्याने आपल्या धावांचा वेग वाढवताना केवळ 80 चेंडूतच आपल्या एकदिवसीय शतकी खेळीला गवसणी घातली.

त्यातच सामन्यानंतर विराटने रायुडूची स्तुती करताना सांगितले की, रायुडूने त्याला मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. सामन्यातील परिस्थिती ओळखून तो फलंदाजी करतो. त्यामुळे, संघाला चौथ्या क्रमांकावर एक चांगला पर्याय मिळाल्यामुळे आम्ही आनंदात आहोत. तसेच या शतकी खेळीने रायुडूने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याच्या शतकी खेळीनंतर आम्हाला आशा आहे की विश्‍वचषक स्पर्धेपर्यंत चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाबाबत असलेली आमची चिंता मिटली आहे. तणावाच्या परिस्थितीत रायुडू चांगली कामगिरी करतो. त्याला आम्ही बऱ्याच वर्षांपासून ओळखतो आणि तो चांगली खेळी खेळू शकतो,’ असेही विराट यावेळी म्हणाला.

याशिवाय, रोहित शर्मानेही रायुडूचे कौतुक करताना सांगितले की, विश्‍वचषकासाठी भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाबाबतची चिंता रायुडूने दूर केली आहे. रोहितच्या या विधानाने इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात अंबाती रायुडूची जागा निश्‍चित झाली असल्याचे म्हटले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)