रायरेश्‍वर गड रस्त्याचे काम सुरू

भोर- भोर तालुक्‍यातील रायरेश्वर गडावर जाणाऱ्या कोर्ले- जांभूळवाडी ते रायरेश्वर या रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यामुळे गडावर जाणाऱ्या पर्यटकांची होणारी गैरसोय काही दिवसांत दूर होणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
रायरेश्वर गडावर जाणाऱ्या पर्टकांची गेल्या अनेक दशकांपासून रस्त्या अभावी गैरसोय होत होती. या विषयाच्या अनुषंगाने आमदार संग्राम थोपटे यांनी विधानसभेत अनेक वेळा आवाज उठविला होता. त्यानुसार सरकारने जांभूळवाडी ते रायरेश्वर या रस्तासाठी 1 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार याचे काम सुरू झाले आहे. रायरेश्वर गडाकडे जाणारा मार्ग वनविभाच्या हद्दीतून जात असल्याने रस्त्याच्या कामात अडथळे येत होते; परंतु आता काम सुरू करण्यात येत असल्यामुळे नागरिक व पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)