रायरेश्‍वर गडाच्या संवर्धनासाठी मदत करणार

खासदार संभाजीराजे भोसले यांचा मावळ्यांना अश्वासन

भोर – हिंदवी स्वराज्याची छत्रपती शिवरायांनी शपथ घेतलेल्या भोर तालुक्‍यातील किल्ले रायरेश्वर गडाची भूमी पवित्र असून या गडावरील शिवमंदिराचा जिर्णोद्धार आणि संवर्धनासाठी प्रयत्न करून विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे अश्वासन छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी मावळी जनतेला दिले. रायरेश्वर युवा प्रतिष्ठान आणि रायरेश्वर उत्सव समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हिंदवी स्वराज्य शपथदिन सोहळ्यात मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे भोसले बोलत होते. वरळी मुंबई विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल शिंदे या सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी होते.

यावेळी रायरेश्वर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळेकर, सचिव संदिप खाटपे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, इतिहासाचे अभ्यासक सुरेश शिंदे, रायरीचे सरपंच सूर्यकांत किंद्रे, पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार, जमादार प्रदीप नांदे, सचिन कुडले, अभिजीत येनपुरे, सचिन देशमुख, राजेश महांगरे, सागर खोपडे, राजेश शेळके, गडावरील सर्व जंगम, धनंजय आवाळे, दत्ता अब्दागिरे, मंगेश आवाळे आदी शिवप्रेमी मावळे उपस्थित होते.
यावेळी खासदार संभाजीराजे भोसले यांचे उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढून स्वराज्य संकल्प दिनाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला, तर शिवमंदिरातील शंभुमहादेवाच्या पिंडीस राजांचे हस्ते अभिषेक, होमहवन करण्यात आले, तसेच या वेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात आली. शिवव्याख्याते शिंदे यांचे व्याख्यान झाले.
आपले भाषणात पुढे बोलताना खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले की, या पवित्र भूमीचे दर्शन घेण्याची इच्छा आज पूर्ण झाली असून छत्रपतींची जयंती उत्सव साजरी करताना त्यांच्या काळातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमींनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन करून रायरेश्वर गडावरील पठार आणि परिसरासह येथील शिवमंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी येथील जनतेला ताकद मिळावी यासाठी कायम सहकार्य करीन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)