रायबरेलीमध्ये फक्त परिवारवाद पाहिला आहे, पण विकास पाहिला नाही-अमित शहा

रायबरेली : काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या रायबरेलीमध्ये आज भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर सडकून टीका केली. ‘या जिल्ह्यात फक्त परिवारवाद पाहिला आहे. पण विकास पाहिला नाही’, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.

काँग्रेसच्या ‘भगवा आतंकवाद’सारख्या टीकेलाही अमित शहा यांनी यावेळी सडेतोड उत्तर दिले. काँग्रेसच्या मक्का मशिद प्रकरणी तुम्ही केलेल्या कामावर पाणी फेरले आहे. त्यामुळे तुम्हाला लोकांची माफी मागायला हवी, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. वोटबँक मजबूत करण्यासाठी काँग्रेसने हिंदू संस्कृतीला बदनाम करण्याचे काम केले आहे, असेही ते म्हणाले. ‘काँग्रेसला हिंदू दहशतवादाचं खोटं पसरविण्यासाठी माफी मागायला हवी की नाही? असेही अमित शहा यांनी त्यांच्या शैलीत विचारले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)