रायपूर पेरू बाजारात दाखल

पिंपरी – पिंपरी बाजारात रायपूर पेरू दाखल झाला आहे. या पेरूच्या आकाराकडे बघताच क्षणी ग्राहक आकर्षित होत आहेत. बाजारात तुरळक ठिकाणीच रायपूर पेरू बघायला मिळत आहे.

पाचशे ग्रॅम ते नऊशे ग्रॅमच्या आसपास म्हणजेच अर्धा किलोच्यावर वजन असलेल्या रायपूर जातीच्या पेरूचा हंगाम सुरू झाला आहे. दिसायला मोठा असल्याकारणाने ग्राहक पेरूकडे बघून आकर्षित होत आहे. यामध्ये बिया नसल्याने तसेच चवीला गोड असल्याने याची ग्राहकांकडून मागणी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या पेरूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सातारा, बारामती येथील शेतकरी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तेथून संपूर्ण महाराष्ट्र भर हा पेरू पुरवला जातो. तसेच पेरू आकर्षक वेष्ठनात ठेवलेला असल्यामुळे सध्या बाजारात उठून दिसत आहे.

-Ads-

पुण्यातील गुलटेकडी परिसरात या पेरूची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तसेच तिथला घाऊक बाजार भाव 40 रूपये किलोपासून 150 रूपये किलोपर्यंत आहे. पिंपरीत हा 60 रूपये ते 150 रूपये किलोने विकला जात आहे. गावरानी पेरू पेक्षा या पेरूचा आकार मोठा असल्याने ग्राहक कुतूहलाने फळाची चौकशी करत असून पेरूची मागणी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गावरानी पेरू दोन महिन्यापूर्वीच बाजारात दाखल झाला आहे. त्याचे भाव ही 100 च्या जवळपास गेले आहेत. त्यामानाने याचे दर आवाक्‍यात आहेत. मात्र, याची मागणी वाढल्यास त्याचे दर ही वाढण्याची शक्‍यता आहे. आता 60 ते 150 रूपये किलोच्या जवळपास त्याचे दर आहेत, अशी माहिती फळ विक्रेता कुमार शिरसाठ यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)